झेंडेमळा परिसरातील ग्रामस्थांचा नवीन रेल्वे मार्गाला विरोध
तळवडे: तळेगाव ते उरुळी कांचन हा अंदाजे 70 किमी नवीन रेल्वे मार्ग रद्द करून पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याची मागणी बोडकेवाडी, माळीनगर झेंडेमळा, हगवणेमळा येथील ग्रामस्थांनी केली.
या बैठकीस ॲड. प्रविण झेंडे, कृष्णा परंडवाल,उद्योजक माऊली झेंडे, शेखर झेंडे, प्रदीप झेंडे, अशोक झेंडे, संतोष झेंडे, विक्रम झेंडे, कैलास झेंडे, किरण झेंडे, सचिन झेंडे, मोहन झेंडे, प्रथमेश झेंडे, सुनिल झेंडे, अथर्व झेंडे, अभिषेक झेंडे, सुनिल काळोखे, संतोष काळोखे, ज्ञानेश्वर बोडके, रोहित झेंडे यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांनी सांगितले की, आधीच लष्करी प्रकल्प, गॅस लाईन, पेट्रोल पाईपलाईन यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत. त्यातच या नवीन रेल्वे प्रकल्पामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हा मार्ग तात्काळ रद्द करून पर्यायी मार्गाचा विचार करावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
तसेच, मागणी मान्य न झाल्यास पुढील आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.






