तळेगावातील पोस्ट ऑफिस ची जागा बदला
तळेगाव दाभाडे: शहरातील शाळा चौक येथील पोस्ट ऑफिस मध्ये पायऱ्या चढून जाताना वयस्कर नागरिकांना दम लागतो. त्यामुळे या इमारतीत लिफ्टची व्यवस्था करावी. अन्यथा वयस्कर मंडळींना सहज जाणे शक्य होईल अशा जागी पोस्ट ऑफिस हलवावे अशी मागणी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना खातेदार म्हणून सह्या करण्यासाठी पोस्टात बोलविले जाते. पायऱ्या चढून वर गेल्यानंतर पोस्ट ऑफिस मध्ये केवळ तीनच खुर्च्या आहेत त्यावर अगोदरच काही मंडळी बसलेली असतात. त्यामुळे जेष्ठांना ताटकळत उभे राहावे लागते. पोस्ट ऑफिस मधील खुर्च्यांची संख्या वाढवावी व त्यापैकी ३ते ४ खुर्च्या ज्येष्ठांसाठी राखीव ठेवाव्यात. किंवा पोस्ट ऑफिस एखाद्या तळमजल्याच्या ठिकाणी हलवावे.अशी मागणी करण्यात येत आहे.





