*कै.अॕड.कु. शलाका संतोष खांडगे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ ‘एक विद्यार्थी,एक झाड’ उपक्रमाचे आयोजन*
तळेगाव दाभाडे :
श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये दिनांक 08/07/2024 रोजी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी , कै.अॕड.कु.शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट तळेगाव दाभाडे व श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने कै.ॲड.कु.शलाका संतोष खांडगे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ ‘एक झाड, एक विद्यार्थी’ उपक्रम आयोजित करण्यात आला .
कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ.शिल्पा रोडगे(प्रशासन अधिकारी नगरपरिषद तळेगाव दाभाडे),श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री.संतोष खांडगे,सहसचिव तसेच शालेय समिती अध्यक्षा सौ.रजनीगंधा खांडगे, सचिव व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी.चे अध्यक्ष रो.मिलिंद शेलार सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कै.अॕड.कु. शलाका संतोष खांडगे यांच्या फोटोस पुष्पांजली वाहण्यात आली. तद्नंतर कै.कु.अॕड.शलाकाताई यांच्या पवित्र आत्म्यास मनःपूर्वक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण प्रेम निर्माण होऊन पर्यावरणाचे संवर्धन व्हावे याकरिता विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कै.अॕ.कु. शलाका संतोष खांडगे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असे प्रतिपादन आपल्या प्रास्ताविकातून श्री.डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तसेच रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष रो.मिलिंद शेलार सर यांनी केले.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासन अधिकारी सौ.शिल्पा रोडगे यांचा स्वागतपर सत्कार श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहसचिव तसेच शालेय समिती अध्यक्षा सौ.रजनीगंधा खांडगे यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री.संतोष खांडगे,कार्याध्यक्ष श्री.बाळासाहेब शिंदे, सचिव श्री.मिलिंद शेलार सर,खजिनदार श्री.सुदाम दाभाडे, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी चे सर्व पदाधिकारी, शालेय मुख्याध्यापक श्री.रावसाहेब सिरसट,पर्यवेक्षिका सौ.रेणू शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना रोप वाटप करण्यात आले.
पर्यावरणप्रेमी कै.अॕड.कु. शलाकाताई यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या रोपाचे संरक्षण,संवर्धन करून धरती सुजलाम सुफलाम करावी असे मार्गदर्शनपर वक्तव्य श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहसचिव व शालेय समिती अध्यक्षा सौ. रजनीगंधा खांडगे यांनी केले .
‘झाडे लावा ,झाडे जगवा’असा मोलाचा संदेश आपल्या मनोगतातून श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
बालपणीच्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवडीतून सामाजिक जबाबदारी पार पाडावी असे मार्गदर्शन प्रमुख पाहुण्या सौ. शिल्पा रोडगे यांनी केले.
‘एक विद्यार्थी,एक झाड’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी रोपट्याची जोपासना करून वटवृक्ष तयार करावा आणि हरित जागृती निर्माण करावी असा कानमंत्र श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री.संतोष खांडगे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी,कै.अॕड.कु. शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट तळेगाव दाभाडे व श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने व नियोजन शालेय मुख्याध्यापक श्री.रावसाहेब सिरसट, पर्यवेक्षिका सौ. रेणू शर्मा, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ.तेजस्विनी सरोदे,प्राथमिक विभाग प्रमुख सौ.धनश्री पाटील, माध्यमिक विभाग प्रमुख सौ.सुजाता गुंजाळ,सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शालेय शिक्षिका सौ.विजयमाला गायकवाड यांनी केले.