कलापिनी आयोजित नाट्यवाचन कार्यशाळा संपन्न

SHARE NOW

तळेगाव दाभाडे दि. १२

कलापिनीतर्फे आगामी नाट्यवाचन स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांसाठी नाट्यवाचन कार्यशाळा संपन्न झाली. राजेंद्र पाटणकर आणि माधुरी कुलकर्णी हे मार्गदर्शक होते. कार्यशाळेला भरघोस प्रतिसाद मिळाला.

नटराज पूजन झाल्यानंतर अशोक बकरे यांनी सगळ्यांचे स्वागत केले आणि कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला.

मार्गदर्शनाची सुरुवात करताना माधुरी कुलकर्णी यांनी नाट्यवाचन करताना काय काळजी घेतली की नाट्यवाचन प्रभावी होते हे उदाहरण सहित समजावून सांगत मार्गदर्शन केले.

त्यांनी सांगितले, “ संहितेची निवड योग्य आणि लवकर करून एक महिना तरी प्रॅक्टिस करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कलाकारांची निवड भूमिकेप्रमाणे योग्य करणे अत्यंत गरजेचे आहे. निवड योग्य असली की ७० टक्के टक्के काम होते. म्हणून गांभीर्याने विचार करून योग्य निवड करणे गरजेचे आहे. भाषा ही कलाकाराला समजे,ल पेलेल अशी हवी. भाषा शुद्धता ही अत्यंत महत्त्वाची आहे. दोन वाक्यांमधील पॉज हा महत्त्वाचा असल्यामुळे तो किती आणि कसा घ्यायचा हे कळण्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. म्हणून वाचिक अभिनयावर भर देणे गरजेचे आहे.”

नाट्यवाचन रेकॉर्ड करून ऐकणे. त्यामुळे आपल्या चुका आपल्याला समजतात आणि सुधारणा करता येते. माईकचा योग्य पद्धतीने वापरही महत्त्वाचा. अशा काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर माधुरीताई यांनी सहज सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.

Advertisement

 

राजेंद्र पाटणकर सरांनी अनेक उपयुक्त मुद्दे सोप्या भाषेत समजावून सांगितले.

ते म्हणाले, “नाट्यवाचन बसवताना योग्य दिग्दर्शक अत्यंत महत्त्वाचा. आणि त्याचे दिग्दर्शन प्रत्येक कलाकाराने कुठलीही तक्रार न करता चर्चा करून भूमिका समजावून घेणे तितकेच महत्त्वाचे. वाचिक समज, भाव दर्शन, वातावरण निर्मिती, साधं सरळ सहज पारदर्शक वाचन. या गोष्टींची काळजी घेतल्यास नाट्यवाचन नक्कीच प्रभावी होऊन परीक्षक आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचते.”

चांगली संहिता मिळणे ही एक अवघड गोष्ट आहे. अनेक एकांकिका, नाटके, नाट्य प्रवेश यांची अनेक पुस्तके आहेत. ती मिळणे अत्यंत अवघड असते. म्हणून अशा पुस्तकांचा संग्रह कलापिनीने केल्यास त्याचा उपयोग सगळ्यांना होईल. कलापिनीने “पुस्तकांचे पाळणाघर” हा उपक्रम सुरू केल्यास स्पर्धक संख्या नक्कीच वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दोन्ही मार्गदर्शकांनी नाट्य वाचन करताना कसे असावे हे प्रत्यक्ष वाचन करून दाखवले. तसेच स्पर्धकांच्या शंकांचे निरसन पण केले.

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन अशोक बकरे यांनी केले होते. रूपाली पाटणकर, अनघा बोरसे, श्रीपाद बुरसे यांनी सहकार्य केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page