सरहद्द स्कूल येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न… काशीबाई नवले हॉस्पिटल व सारथी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर संपन्न…
पुणे
सरहद्द स्कूल येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. काशीबाई नवले हॉस्पिटल व सारथी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सरहद्द स्कूल मधील सर्व कर्मचारी, शिक्षक, ड्रायव्हर यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. सदर शिबिरामध्ये 200 पेक्षा अधिक लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. बीपी, शुगर, डोळे, कान, घसा, नाक, हाडांची तपासणी यावेळी करण्यात आली. या शिबिराप्रसंगी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी? व्यायाम किती व कसा करावा, संतुलित आहार कसा घ्यावा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रम प्रसंगी सरहद संस्थेचे विश्वस्त माननीय शैलेश वाडेकर सर, सरहद संस्थेचे वाहतूक व सुरक्षा विभाग प्रमुख मयूर मसुरकर सर, वाहतूक इन्चार्ज अमित सालेकर, महाराष्ट्र काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील, सारथी फाउंडेशन चे अध्यक्ष दीपक चौघुले, एडवोकेट कुलदीप नाईक नवरे, उमेश महाडिक, पराग शिळीमकर आदी मान्यवर उपस्थित होते.