सरस्वती विद्या मंदिर, इंदुरीचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

SHARE NOW

इंदोरी

‘चला घडवूया नवा भारत’ या संकल्पनेवर सरस्वती विद्या मंदिर इंदुरीमध्ये स्नेहसंमेलन संपन्न झाले बालवाडी व प्राथमिक असेच स्नेहसंमेलन झाले. या स्नेहसंमेलनात मा.श्री अतुल पवार सहसंपादक साप्ताहिक अंबर, अध्यक्ष तळेगाव दाभाडे पत्रकार संघ हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इंदोरी ग्रामपंचायत सरपंच मा. श्री शशिकांत शिंदे हे देखील उपस्थित होते.

तसेच माननीय श्री विठ्ठलराव शिंदे (माजी सभापती पंचायत समिती मावळ) मा. सौ जयश्रीताई सावंत (ग्रामपंचायत उपसरपंच) मा. श्री प्रशांत ढोरे (मा. सदस्य पुणे जिल्हा परिषद) ग्रामपंचायत सदस्य मा. श्री लतिकाताई शेवकर, मा. सौ. सुरेखाताई शेवकर यादेखील या देखील कार्यक्रमास उपस्थित होत्या.

Advertisement

अहवाल वाचन शाळेचे मुख्याध्यापक श्री नितीन शिंदे सर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख बालवाडी व प्रमुख मा. अर्चना एरंडे बाई यांनी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तलिखिताचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थी व शिक्षक यांना सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री प्रशांत ढोरे व श्री विठ्ठलराव शिंदे यांनी शाळेच्या प्रगती बद्दल समाधान व्यक्त केले व शाळा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली

संस्थेचे अध्यक्ष मा. श्री सुरेश झेंड सर, दिलीप कुलकर्णी, सुचित्राताई चौधरी, कार्यवाह प्रमोद देशक, सदस्य मा. श्री विश्वास देशपांडे, माजी सदस्य मा. श्री. रमेश थिटे सर तळेगाव शाळेच्या बालवाडी विभाग प्रमुख मा. सौ सोनाली काशीद उपस्थित होत्या. सूत्रसंचालन श्रीमती रत्नमाला भुजबळ यांनी केले. यावेळी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला. सांस्कृतिक कार्यक्रमात शंभर टक्के विद्यार्थ्यांनी यशस्वी सहभाग नोंदवला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page