“युगपुरुष स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

SHARE NOW

तळेगाव दाभाडे

 

श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल येथे युगपुरुष स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती आज उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

 

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुनील कामथन सर (अखिल भारतीय निवृत्त रेल्वे पुरुष महासंघ, पुणे विभाग अध्यक्ष – RRPWA), श्री विद्याभूषण सर (प्रेरक वक्ते व कार्पोरेट व्यावसायिक, प्लांट प्रमुख – महिंद्रा एस.बी.यू., चाकण–खराबवाडी), सौ. ममता कामथन मॅडम, अनामिका सिन्हा मॅडम उपस्थित होते. श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या शालेय समिती अध्यक्षा सौ रजनीगंधा खांडगे, संचालक श्री रामराव जगदाळे सर, खजिनदार श्री सुदामजी दाभाडे सर, सचिव मिलिंद शेलार सर, कुसुमताई वाळुंज मॅडम व अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व स्वागतगीताने झाली. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ रेणू शर्मा मॅडम यांनी दिवसाचे महत्त्व विशद केले. विद्यालयाचे शिक्षक सचिन झेंडे सर यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्याने कार्यक्रमात रंगत आणली.

Advertisement

 

इयत्ता पाचवीचा विद्यार्थी स्वराज चिमटे व इयत्ता नववीची विद्यार्थिनी कु. शमिका केदारी यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊंची भूमिका साकारली. विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या कार्यावर अभ्यासपूर्ण मांडणी केली.

 

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त चित्रकला, निबंध व प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धांतील पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

 

श्री सुनील कामथन सर, श्री विद्याभूषण सर व कुसुमताई वाळुंज यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिले. शालेय समिती अध्यक्षा सौ रजनीगंधा खांडगे मॅडम यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार व व्यक्तिमत्त्व विकास घडतो, असे मनोगतातून स्पष्ट केले.

 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार व्यक्त विद्यालयाचे शिक्षक सचिन झेंडे सर व अश्विनी जोशी यांनी केले. श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री संतोष खांडगे सर व अन्य पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाची कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.”


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page