लोणावळा नगर परिषद यादीचा घोळ त्वरित सोडवा,अन्यथा निवडणूक काळात मतदारांचा आक्रोशाला सामोरे जावे लागेल- जितुभाई कल्याणजी
लोणावळा:
लोणावळा नगरपरिषद निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना काही मतदार यादी मध्ये नावात फरक दिसून येत आहे. काही ठिकाणी असं आढळून आलं की बरेचसे नाव काही प्रभाग मधले दुसरा प्रभागांमध्ये विलीन झाली आहेत. आणि त्या मोठ्या प्रमाणात आहेत असं दिसून येतंय. हा घोळ निवडणुकी आधी नाही मिटवला तर ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी खूप मतदारांचे हाल होतील काहींना नावात फरक असल्याने मतदानपासून वंचीत राहावे लागेल.तसेच जे निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत अश्या उमेदवार यांनाही कसरत करावी लागणार आहे. आपल्या वार्डातील मतदार दुसऱ्या वार्डात शोधासाठी मोठी अडचण येणार आहे. अनेक इच्छुक यांनी तर ज्यांचे कधी नावं ही ऐकली नाहीत अश्या अनेक उमेदवारांनी मतदार यादीचा अभ्यास न करता सोशल मीडियावर फिक्स नगरसेवक, फिक्स नगरसेविका ची जाहिराती सुरु केल्या आहेत.परंतु प्रत्यक्षात निवडणुकीवेळी आपले मतदार दुसऱ्या वार्डात आहेत,किंवा त्यांची नावे चुकीची टाकली गेली आहेत अश्या मतदारांना मतदान करता येणार नाही असे कळल्यावर मात्र इछुक उमेदवारांचा मोठा संताप होणार आहे.त्यासाठी ज्या वार्डात मतदार आहेत त्याच वार्डात त्यांची नावे असणे,नावात काही दुरुस्ती असल्यास ती त्वरित करून घेणे याकडे तातडीने लक्ष देणे पालिका आणि निवडणूक प्रशासनाने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे अशी अपेक्षा लोणावळ्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि माजी शिक्षण मंडळ सभापती जितुभाई टेलर यांनी मावळ मराठा न्युज शी बोलताना व्यक्त केली.त्यांच्या मते प्रभाग क्रमांक ८ मध्ये ४३७५ / ४७३१ यामध्ये प्रभाग क्रमांक ४ चे नाव आढळून आले आहेत. अश्या चुका अंदाजे साधारण ३०० ते ३५० असू शकतात.आणि वार्ड निहाय एक एक मतदार महत्वाचा असतो.त्यामुळे ह्या चुका प्रशासनाने त्वरित सोडवणे आवश्यक आहे.






