RMK Spaces मुळे मावळ तालुक्यात आणखी एक जर्मन कंपनी! बुकर्ट इंडिया कंपनी चे मॅन्यू फॅक्चरिंग युनिट सुरु…

तळेगाव प्रतिनिधी –

तळेगाव MIDC मध्ये अनेक मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. आज बुर्केर्ट इंडिया कंपनीने तळेगाव येथे mfg युनिट सुरु झाले.जर्मन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बर्कर्टने तळेगावात आपले व्हॉल्व्ह आणि सेन्सर उत्पादन युनिट सुरू केले आहे. नवीन सुविधेमध्ये 50,000 sqft चा समावेश आहे आणि वार्षिक 30,000 पेक्षा जास्त व्हॉल्व्ह आणि 500 ​​सिस्टीम तयार करण्याची क्षमता आहे. भारतात ९१ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. युरोप, यूएस आणि चीनमधील सुविधांनंतर पुण्यातील कारखाना हा भारतातील कंपनीचा पहिला कारखाना आहे. “स्थानिक स्तरावर उत्पादन करून, आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करणाऱ्या सानुकूलित उत्पादने आणि प्रणालींसह अधिक चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतो,” असे प्रतिपादन बर्कर्ट फ्लुइड कंट्रोल सिस्टीमचे सीईओ जॉर्ज स्टॉववी यांनी केले. उदयोजक आणि काँग्रेसचे नेते रामदासअप्पा काकडे यांनी सतर्क महाराष्ट्र ला सांगितले की तळेगाव एम‌आयडीसी बरोबरच ग्रामीण भागात RMK Spaces चे एमडी श्री. रणजीत रामदास काकडे व त्यांचे सहकारी यांच्या प्रयत्नाने आज पर्यंत 35 कंपन्या मावळात आणल्या..जसे हुंडाई,संगवू हायटेक,एन्कीएन् इंडिया ऑटो,

Advertisement

पीएचए इंडिया प्रायव्हेट, कोमोस ऑटोमोटिवा,डुवन ऑटोमोटिव्ह सिस्टम इंडिया,प्याराकोट प्रॉडक्ट लिमिटेड,मुवामॅक्स सिस्टम लॉजिस्टिक,प्यूअर ऑल प्रायव्हेट लिमिटेड इत्यादी अनेक कंपण्यांची एकूण गुंतवणूक ६६४० कोटी रुपयांची झाली असून त्या मुळे स्थानिक ८६४० लोकांना रोजगार उपलब्ध झाला असल्याचे प्रतिपादन रामदासअप्पा काकडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page