*तळेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने अमली पदार्थ विरोधी कार्यक्रम*

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

Advertisement

तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीतील हाय व्हिजन इंटरनॅशनल स्कूल सोमाटणे फाटा, या ठिकाणी अमली पदार्थ विरोधी सप्ताह, कार्यक्रमाच्या अनुषंगाने वरील नमूद शाळेत भेट देऊन विद्यार्थी यांच्याशी संवाद साधून “अमली पदार्थ सेवन व त्याचे दुष्परिणाम “या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करून प्रथम द्वितीय तसेच तृतीय क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षीस वितरण केले तसेच सुंदर हस्ताक्षर असणाऱ्या विद्यार्थी यांना देखील प्रोत्साहन पर बक्षीस देऊन गौरविण्यात आले आणि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रम घेण्यात आला.सदरच्या स्पर्धेत १०० ते १५० दहावीचे विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.यावेळी पीएसआय मुल्ला साहेब, पोलीस उपनिरीक्षक पाटील मॅडम, पोलीस अंमलदार कातकडे, काशाळे, व दामिनी पथक सुनंदा जाधव उपस्थित होते.

अशी माहिती कन्हैया थोरात वरीष्ठ पोलीस निरीक्षक तळेगाव दाभाडे यांनी दिली.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page