” श्री संत ज्ञानेश्वर महाराज ७५० वा जन्मोत्सव सोहळा” ( सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सव) उत्साहात साजरा…….

SHARE NOW

तळेगाव दाभाडे:

श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७५० वा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला .

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रेणू शर्मा मॅडम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सौ चैताली भोसले मॅडम व कु. किर्ती टपाले मॅडम यांनी माऊलीच्या जीवन प्रवासावर मनोगत व्यक्त केले. तसेच शाळेतील विद्यार्थिनींनी अभंगातून माऊलीचे व विठ्ठलाचे वर्णन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. व सोहळ्याची शोभा वाढवली. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रेणू शर्मा मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Advertisement

आतां विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञे तोषावें । तोषोनि मज द्यावें पसायदान हे!

अखिल विश्वाच्या कल्याणासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करणारे महान संत म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली होय.. ज्ञानेश्वरी ग्रंथाचे शेवट पसायदान या नावाने ओळखला जातो. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मोत्सव सोहळ्या निमित्त सामूहिक पसायदानाचे गायन करण्यात आले.

कु. नम्रता मॅडम व सौ सुनिता रेवणशेट्टी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले. श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री संतोष खांडगे सर, शालेय समिती अध्यक्षा सौ रजनीगंधा खांडगे मॅडम, कार्याध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे सर, सचिव श्री मिलिंद शेलार सर यांनी कार्यक्रमाची कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page