देहूरोड–किवळे परिसरात संविधान दिन उत्साहात साजरा,डोईफोडे यांचे विचार : “संविधान हा सर्वांचा समान ग्रंथ”

SHARE NOW

देहूरोड :

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, देहूरोड शहर व विकास नगर किवळे यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनाचे कार्यक्रम देहूरोड व किवळे येथे उत्साहात संपन्न झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, देहूरोड येथे भारतीय जनता पार्टीचे नेते लहू मामा शेलार आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रशासक अॅड. कैलास पानसरे यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

 

विकास नगर किवळे येथे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नानासाहेब डोईफोडे व भाजप मंडळ अध्यक्ष मोहन शेठ राऊत यांच्या हस्ते संविधान दिन साजरा करण्यात आला. या ठिकाणी २५ संविधान मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच सुमारे ५०० संविधान प्रास्ताविकेचे पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.

 

मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नानासाहेब डोईफोडे म्हणाले,

Advertisement

“संविधान हा देशाचा सर्वोत्तम ग्रंथ आहे. विविध धर्मांचे वेगवेगळे धार्मिक ग्रंथ असले तरी आपला सर्वांचा एकच ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान. संविधानाच्या मुळ ढाच्यात कोणताही बदल कोणीही करू शकत नाही. केवळ विद्यमान सरकारला सुधारणा करण्याचा अधिकार आहे आणि पूर्वीही त्या केल्या गेल्या आहेत. संविधान बदलल्याचा खोटा प्रचार थांबवला पाहिजे. भारत हा एका धर्माचा देश नसून विविध पंथ-धर्मांचा समन्वय असलेला राष्ट्र आहे. येथे सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. हा देश लोकशाही आहे आणि कायम लोकशाहीच राहील.”

 

कार्यक्रमास अॅड. कृष्णाजी दाभोळे, आरपीआयचे दिलीप कडलक, सुनील गायकवाड, अरविंद गायकवाड, इंद्रपाल रत्तू, बाळू जगताप, अशोक चव्हाण, बाळासाहेब धावरे, रवींद्र कदम, नानासाहेब डोईफोडे, मोहन राऊत, सुधीर साळुंखे, उमेश सांडभोर, अनिल चव्हाण, शिवसेनेचे शहरप्रमुख निलेश तरस, राजेंद्र तरस यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे आयोजन धर्मपाल तंतरपाळे यांनी केले असून सूत्रसंचालन सिंधुताई तंतरपाळे यांनी प्रभावीपणे पार पाडले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page