पवना धरण वाचवा! मुरूम माफियांवर MCOCA लावा! पवना धरणातून रात्रीतून 50 डंपर हायवा मुरूम चोरी; मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांकडे कारवाईची मागणी – युवराज दाखले यांचा इशारा

SHARE NOW

पिंपरी-चिंचवड, दि. १४: प्रतिनिधी,मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत 50 पेक्षा अधिक हायवा डंपरद्वारे अवैध मुरूम व मातीचे उत्खनन सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी केली आहे.

 

“पवना धरण हे लाखो नागरिकांची जीवनवाहिनी आहे. याच धरणाच्या काठावरून JCB-पोकलेन लावून 20-30 फूट खोल खड्डे खणून मुरूम चोरला जात आहे. विना नंबर प्लेटच्या हायवा ट्रक गेव्हाण खडक, चांदेवाडी, ठाकूरसाई, ब्राह्मोली, कोथुर्णे, शिवली मार्गे चांदखेडकडे जातात. स्थानिक महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय हे शक्य नाही,” असा गंभीर आरोप युवराज दाखले यांनी केला.

 

धोक्याची घंटा:

1. धरणाच्या भिंतीला धोका – साठवण क्षमता घटतेय

 

2. भूजल पातळी खालावली – शेतकरी देशोधडीला

Advertisement

 

3. पर्यावरणाचा ऱ्हास – 1966 चा महसूल कायदा व 1986 चा पर्यावरण कायदा पायदळी

 

4. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी नापीक बनवल्या

 

युवराज दाखले यांच्या मागण्या:

 

1. मुख्यमंत्र्यांनी विशेष भरारी पथकनेमून 24×7 गस्त लावावी

 

2. मुरूम माफिया व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर MCOCA अंतर्गत गुन्हे दाखल करावेत

 

3. पवना धरण 5 किमी परिसर “No Mining Zone”घोषित करावा

4. ड्रोन सर्व्हे करून दंडात्मक वसुली करावी

 

5. जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून 7 दिवसांत अहवाल मागवावा

 

6. सर्व हायवा-डंपर जप्त करून वाहतूक बंद करावी

 

मुख्यमंत्री देवेंद्रजी व महसूल मंत्री बावनकुळे साहेब, पवना वाचवा. 7 दिवसांत कारवाई न झाल्यास शिवशाही व्यापारी संघ, व शेतकरी मिळून मंत्रालयासमोर ठिय्या देऊ. मुरूम माफियांना मावळातून हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,” असा सज्जड इशारा युवराज दाखले यांनी दिला आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page