*सोंगाड्या आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा द्यावा – रविंद्र भेगडे*
वडगाव (मावळ ):
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचा सोंगाड्या आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून त्यांचा जाहीर अपमान केल्याबद्दल आज मावळ भाजपच्या वतीने जितेंद्र आव्हाड विरोधात जोडे मारो आंदोलन करून त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला!
तसेच जितेंद्र आव्हाड यांना विधानसभेचा सदस्य म्हणून काम करण्याचा नैतिक अधिकार राहिला नसुन विधानसभा अध्यक्षांनी त्यांची हाकलपट्टी करावी व पोलीस प्रशासनाने त्यांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी मावळ भाजपचे नेते विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र आप्पा भेगडे यांनी केली आहे.
यावेळी भाजपा किसान मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष मा.गणेशभाऊ भेगडे, जेष्ठ नेते मा.सुकणशेठ बाफना , पंचायत समितीचे मा.सभापती मा.गुलाब काका म्हाळसकर, मावळ भाजपा कोषाध्यक्ष मा.सुधाकरभाऊ ढोरे, वडगाव शहर भाजपचे अध्यक्ष मा.संभाजी भाऊ म्हाळसकर,तळेगाव शहर भाजपा युवा नेते मा.वैभवभाऊ कोतुळकर, मावळ भाजपा ता.सरचिटणीस मा.अभिमन्यू भाऊ शिंदे, मावळ भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष मा.सूर्यकांत भाऊ सोरटे , तळेगाव शहर भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष मा.गौरव भाऊ गुंड, कामशेत शहर युवा मोर्चा अध्यक्ष मा.प्रवीण भाऊ शिंदे, सोशल मिडिया अध्यक्ष रवि शिंदे यांच्यासह वडगाव शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..!