*परांजपे विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या
अॕड.पु.वा.परांजपे विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी स्वागत आशा आवटे यांनी केले. सचिव संतोष खांडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी केले.त्यांनी प्रगतीचा चढता आलेख सांगितला.संतोष खांडगे यांनी भाषणात स्वातंत्र्याच्या त्यागाची आठवण करुन दिली. हर घर तिरंगा ,तिरंग्याचे महत्त्व याविषयी देशभक्तिची भावना उपस्थितांच्या मनात रुजविली.आभार पर्यवेक्षिका रेखा भेगडे यांनी मानले. सुत्रसंचालन आशा आवटे, अनिता नागपूरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकत्तेर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.