अरविंद एज्युकेशन सोसायटीमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती (बालिका दिन) उत्साहात साजरी
पिंपरी :
स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशालेतील बालिकांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षा आरती राव, संस्थेचे सचिव प्रणव राव, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुलच्या मुख्याध्यापिका पिंकी मनिकम, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य शीतल मोरे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, पर्यवेक्षिका प्रिती पाटील, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
आरती राव म्हणाल्या, की प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभे राहिले राहून आत्मनिर्भर बनले पाहिजे. आत्मनिर्भरपणा तिला उमेद देतो, उभारी देतो आणि विशेष म्हणजे अस्तित्व देतो, म्हणून प्रत्येक स्त्रीने आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे.
प्रणव राव म्हणाले, की सावित्रीबाई फुले यांच्या दूरदृष्टीमुळे आजची स्त्री विविध क्षेत्रे पादाक्रांत करीत आहे, ही मोठी क्रांती आहे.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका म्हणाल्या, की आजची स्त्री ही प्रत्येक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहे, याचे सर्व श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते.
शिक्षिकांनी सावित्राबाई फुले यांच्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी मुलींनी शिकून स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, असे विद्यार्थिनींना आवाहन केले.