प्राध्यापिका प्रतिभा गाडेकर यांना सन्मान नारी शक्तीचा 2025 हा जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान.
तळेगाव दाभाडे :
इंद्रायणी ज्युनिअर कॉलेज तळेगाव दाभाडे या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या प्राध्यापिका प्रतिभा नितीन गाडेकर यांना पुणे शहर जिल्हा शिक्षक काँग्रेसच्या वतीने सन्मान नारीशक्तीचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊंच्या लेकींचा हा जिल्हास्तरीय पुरस्कार त्यांना मिळाला.
प्राध्यापिका प्रतिभा गाडेकर यांच्या ठिकाणी असलेली काम करण्याची जिद्द, प्रामाणिकपणा यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुणे शहर शिक्षक काँग्रेस अध्यक्ष विजय कचरे, रामप्रभू पेटकर तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सदस्य यशराजजी पारखी यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला.