लोणावळ्यातील भांगरवाडी रेल्वे गेट दोन दिवस बंद,पर्यायी मार्गांचा सल्ला

SHARE NOW

लोणावळा : भांगरवाडी रेल्वे गेट येथे इंटरलॉकिंगचे महत्त्वाचे तांत्रिक काम नियोजित असल्याने हा गेट ६ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून ते ८ डिसेंबर सकाळी आठ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती रेल्वे विभागाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रकातून देण्यात आली आहे.

 

भांगरवाडी गेट हा लोणावळा शहरातील नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीचा प्रमुख मार्ग असल्याने शनिवारी आणि रविवारी या गेटच्या बंदमुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे. नेहमीच व्यस्त असणाऱ्या या मार्गाचा पर्याय म्हणून नागरिकांना गवळीवाडा नाका मार्गे प्रवास करावा लागेल. मात्र या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने दोन दिवस अतिरिक्त ताण निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

Advertisement

 

गैरसोय कमी करण्याच्या दृष्टीने गेट क्रमांक ३४ पूर्ण वेळ खुला ठेवण्यात येणार आहे. तसेच गेट क्रमांक ३०, ३१ आणि ३४ येथे अतिरिक्त कर्मचारी नेमून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहनही रेल्वे विभागाने केले आहे. शहरातील वाहतूकव्यवस्थेवर या बंदचा मोठा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे प्रशासन सतर्क राहून वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक ती पावले उचलत आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page