बंजारा सेवा संघ मावळ यांच्यावतीने वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी
तळेगाव दाभाडे :
बंजारा सेवा संघ मावळ यांच्यावतीने हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
तळेगाव दाभाडे झालेल्या कार्यक्रमात वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगर परिषदेच्या उपाधिकारी ममता राठोड, बंजारा सेवा संघ मावळचे संस्थापक अध्यक्ष हिरा जाधव, मावळ तालुकाध्यक्ष महादेव राठोड, विजापूर जिल्हा परिषद सदस्य रामू राठोड, उपाध्यक्ष चंदू राठोड, खजिनदार राजू पवार, सचिव नितीन चव्हाण, अर्जुन आढे, शेट्टी चव्हाण, जयराम चव्हाण, यंका राठोड, सोमा राठोड आदी उपस्थित होते.
हिरा जाधव म्हणाले, की बंजारा समाजाला संघटित करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, समाजात चांगला संदेश देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.