समाज उभारणी, विद्यार्थ्यांची जडणघडण, भावी पिढीचे उज्वल भविष्याकरिता महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण- रो मिलिंद शेलार
तळेगाव दाभाडे :
रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी तर्फे महिला दिनानिमित्त स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये महिला शिक्षकांचा सन्मान करण्यात आला…
शिक्षण हेच समाज परिवर्तनाची खरे माध्यम आहे. आणि ते परिवर्तन घडवण्याचे पवित्र कार्य आपण सर्व महिला शिक्षक करत आहात. आपण मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत तर त्यांच्यामध्ये शिस्त नैतिकता आणि चांगले मूल्य रुजवता आपल्या मेहनतीमुळेच आजची तरुण पिढी उज्वल भविष्य घडवते आहे. असे मत रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष रो.मिलिंद शेलार यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
याप्रसंगी तंत्रज्ञान कौशल्य विकसित करण्याकरिता डिजिटल सखीच्या माध्यमातून महिलांसाठी तंत्रज्ञानयुक्त व्यासपीठ महिला दिनानिमित्त उपलब्ध करून डिजिटल सखी बाबत मार्गदर्शन रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी चे जिल्हा लिटरसीचे उपप्रमुख रो संदीप मगर यांनी केले. याप्रसंगी रो विलास टकले उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष रो.संतोष खांडगे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
स्वामी विवेकानंद स्कूलच्या सर्व महिला शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचा गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रावसाहेब शिरसाठ यांनी केले तर सूत्रसंचालन कलाशिक्षक श्री विजय जाधव यांनी केले तर आभार सिद्धेश्वर सोनवणे यांनी मानले.