तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी चोरीस गेलेल्या मुद्देमाला सकट चोरी करणारास अटक
तळेगाव दाभाडे :
तळेगाव एमआयडीसी पो.स्टे गुन्हा रजि.नं. ७३/२०२५ भा.न्या. स. कलम ३०६ मधील आरोपी अटक व चोरीस गेला माल हस्तगत बाबत..
फिर्यादी श्री. अर्जुन रामबाबु महतो वय ३४ वर्षे व्यवसाय फेब्रीकेशन रा. एस. एम. हाईटस, इंदापुरी कॉलनी, तळेगाव दाभाडे ता. मावळ जि. पुणे यांचे मालकीचे मौजे गोळेवाडी ता. मावळ जि.पुणे गावचे हद्दीत ए. एस. कन्स्ट्रक्शन कंपनी असुन कंपनीत काम करणारा नोकर आरोपी नामे एस प्रसाद वय ३० वर्षे सध्या रा. एक्ारबिया सोसा. ए/५, रूम नं. ४१२ आंबी ता. मावळ जि. पुणे. मुळ रा. तिरूमनचोलाही ता. जि. शिवगंगा राज्य तामीळनाडु याने कंपनी मालक व कामगारांचे परस्पर कंपनीचे कॅयीन मधील कंपनीचे दोन लॅपटॉप व एक डेस्कटॉप असा एकुण ८५,०००/- रू. चा मालाची चोरी करून पळवुन गेला आहे वगैरे मजकुराचे फिर्यादीवरून तळेगाव एमआयडीसी पो.स्टे गुन्हा रजि.नं. ७३/२०२५ भा.न्या. सं.क. ३०६ प्रमाणे दिनांक १५/०४/२०२५ रोजी गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे संबंधाने मा. विनयकुमार चोबे साो. पोलीस आयुक्त, पिपंरी चिचवंड, वसंत परदेशी सो. सह पोलीस आयुक्त, विशाल गायकवाड सो. पोलीस उप आयुक्त परि.०२, श्री. बाळासाहेब कोपनर सो. सहा. पोलीस आयुक्त, देहूरोड विभाग व रणजित जाधव साो. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तळेगाव एमआयडीसी पो.स्टे. यांचे मार्गदर्शन व सुचना प्रमाणे तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणेतील तपास पथकातील पोलीस हवा. ४६८, ए. डी. रावण, पो.ना. १०६७, डी. के. सातकर व पो. कॉ. ३५७१, व्ही. बी. शेरमाळे यांनी तांत्रीक तपास करून तामीळनाडु राज्यात जावुन स्थानिक पोलीसांचे मदतीने आरोपीचा शोध घेवून आरोपीस दिनांक २१/०४/२०२५ रोजी अटक करून त्याची तीन दिवस पोलीस रिमाड घेवून चोरीस गेले दोन लॅपटॉप व एक डेस्कटॉप असा एकुण ८५,०००/- रू. चा १००% माल हस्तगत केला आहे. नमुद पोलीस अंमलदार यांनी चांगली कामगिरी केली आहे.