*इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कृष्णराव भेगडे फार्मसी महाविद्यालयात “अश्वमेध 2025” वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात साजरा*
तळेगाव दाभाडे :
इंद्रायणी विद्यामंदिर संस्था संचलित कृष्णराव भेगडे इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च महाविद्यालयात स्वागत समारंभ आणि “अश्वमेध 2025” वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन शुक्रवार दि. 21 मार्च २०२५ रोजी करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आर एम के उद्योग समुहाच्या संचालिका सौ. सुनंदाताई रामदास काकडे यांची उपस्थिती होती.
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रामदास अप्पा काकडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच संस्थेचे कार्यवाह श्री. चंद्रकांत शेटे आणि इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे हे हि या वेळी उपस्थित होते. त्याचप्रमाणे माजी मंत्री मा. श्री. बाळासाहेब भेगडे यांनी कार्यक्रमास सदिच्छा भेट देऊन आपले मनोगत व्यक्त केले.
मा. श्री. रामदास अप्पा काकडे यांनी बोलताना उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांपैकी यशस्वी उद्योजक तयार व्हावेत व भविष्यात अध्यक्षीय पद भूषवावे असे भावनात्मक आवाहन त्यांनी केले. तसेच मागील काही वर्षातील महाविद्यालयाची होत असलेली यशस्वी वाटचाल आणि औषधनिर्माण शास्त्रातील निर्माण झालेल्या नवनवीन नोकरीच्या संधी यामुळे महाविद्यालयाला एक वेगळे महत्व प्राप्त झालेले आहे.तसेच संशोधन क्षेत्रात सुद्धा महाविद्यालय मागे राहिलेले नसून चालू केलेले पदवीत्तर पदवी कोर्सेस आणि ऍनिमल हाऊस हि महाविद्यलयाची जमेची बाजू ठरली आहे.
महाविद्यालयच्या प्रगतीचा वार्षिक अहवाल प्राचार्य डॉ. आरोटे यांनी सादर केला. अहवाल सादर करताना महाविद्यलयाचा ९८ टक्के निकाल, विदयार्थ्यांना मिळालेली ७० टक्के प्लेसमेंट आणि शिक्षकांनी केलेले संशोधन या विषयीची माहिती सर्वाना दिली.
अश्वमेध 2025 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. युगंधरा कंगराळकर, कु. वेदिका चोरगे, कु.शर्विल कोल्हे, कु.जयेश शिरसाठ,कु. प्रतीक भाईक, कु. श्वेता कांबळे, कु.वेदिका आंधळे, कु.अनुराधा पांचाळ, कु. वैष्णवी अस्वले, कु. श्रुष्टी मुरुडे , कु. स्नेहल तापकीर आणि कु. प्रीती यादव यांनी केले. प्रा. गुलाब शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले. आयुष साळवे, (जनरल सेक्रेटरी), साक्षी घोळवे या विद्यार्थी प्रतिनिधीनी कार्यक्रमाची जबाबदारी उत्तम पार पडली. सर्व कार्यक्रमाच्या यशस्वी व शिस्तबद्ध आयोजनासाठी प्रा. कादंबरी घाटपांडे, प्रा. सोहिनी गांगुली, प्रा. महेश गावडे, प्रा. शुभम वाघमारे व प्रा. अश्विनी जोशी यांनी परिश्रम घेतले.
संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रामदास काकडे, कार्यवाह मा.श्री. चंद्रकांत शेटे, सदस्या मा. सौ. निरूपा कानिटकर इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास विद्यार्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.