कृष्णराव भेगडे फार्मसी महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्था संचालित, कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासु्टिकल एज्युकेशन अँड रिसर्च महाविद्यालयामध्ये शनिवार दि. 05/04/2025 रोजी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा उत्साहात पार पडला,, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे यांनी दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गणेश म्हस्के यांनी केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाचा आलेख पालकांसमोर मांडला.
संस्थेच्या विश्वस्त, सौ.निरूपा कानिटकर यांनी पालकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी महाविद्यालयामध्ये उपस्थितीचे महत्व सांगितले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे सर यांनी भविष्यात विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजना व त्या प्रत्यक्षात साकरण्यासाठी करत असलेले प्रयत्न याचीही माहिती दिली. पालकांनीही आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीचा वेळोवेळी आढावा घ्यावा असे डॉ. संजय आरोटे यांनी सांगितले. श्री. गंगाधर सोनवणे यांनी पालक प्रतिनिधी म्हणून आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाला पालकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. प्रा. विक्रांती कोळी यांनी सूत्रसंचालन केले.प्रा.महेश गावडे, प्रा. मयूर लोहकरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे विभागप्रमुख प्रा. गुलाब शिंदे यांनी केले. यानंतर अल्पपोहार देऊन कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, कोषाध्यक्ष शैलेश शहा यांनी शुभेच्छा दिल्या.