कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘सृजन पालकत्व’ या शिबिराचे आयोजन!!
तळेगाव दाभाडे :
दिनांक 18. जानेवारी 2025 रोजी कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता पहिली ते दहावीतील पालकांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पालकांनी आपल्या पाल्याला मोठे करताना त्यांच्यासमोर खूप मोठे आवाहन आहे. पाल्याचे संगोपन करताना काय काळजी घेतली जावी. यासाठी कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सृजन पालकत्वाच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व प्रसिद्ध व्याख्याते डॉ. शालिग्राम भंडारी उपस्थित होते. तसेच लायन्स क्लबचे अध्यक्ष मा.श्री. अनिल तानकर सर, लायन्स क्लबचे मेंबर श्री.दीपक बाळसराफ हे उपस्थित होते.तसेच संस्थेचे संस्थापक मा.श्री. चंद्रकांत काकडे,संस्थेचे अध्यक्ष श्री. संदीप काकडे,खजिनदार सौ. गौरी काकडे, शालेय मुख्याध्यापिका सौ. ज्योती सावंत,पर्यवेक्षिका सौ. कीर्ती कुलकर्णी, पर्यवेक्षिका सौ. शुभांगी वनारे व पालक वर्ग उपस्थित होते.या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री. संदीप काकडे यांनी केला. यानंतर या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे प्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर शालिग्राम भंडारी हे एक सामाजिक कार्यकर्ते,प्रसिद्ध लेखक,विद्यार्थी व पालक यांच्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम करणारे ज्येष्ठ व्याख्याते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या मनोगतात पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून दूर कसे राहावे. तसेच त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण कशी करावी व याचबरोबर चांगले संस्कार त्यांच्यात कशा पद्धतीने रुजवले गेले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.आजचा विद्यार्थी हा कशा पद्धतीने घडला पाहिजे याचे मार्गदर्शन करताना ते म्हणाले की,आजची पिढी ही उद्याचे आपल्या देशाचे भविष्य आहे आणि हे चांगलेच घडले पाहिजे. ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. यासाठी सर्व पालकांनी सक्षम असणे आवश्यक आहे.यानंतर शालेय मुख्याध्यापिका सौ. ज्योती सावंत यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,आजच्या युगात मुले ही खूप नवनवीन विचारात गुंतलेली असतात त्यांच्यासमोर खूप नवीन आव्हाने असतात. त्यासाठी पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांसोबत नवीन विचारांना आत्मसात करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले पाहिजे. व डॉक्टर भंडारी सरांनी पालकांना अतिशय योग्य पद्धतीने मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ रश्मी नाटे यांनी केले.