*पोलिस स्टेशन येथे बालस्नेही कक्षाचे उदघाटन*
मावळ :
तळेगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उदघाटन पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे हस्ते शनिवारी(दि.१८)झाले.यावेळी बालस्नेही पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. पिंपरी-चिंचवड सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल हिरे,पोलिस उपआयुक्त विशाल गायकवाड, तळेगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक रणजित जाधव,शकील शेख,होप चिल्ड्रन फाउंडेशनचे संचालक कॕरलींग, अजय चौधरी, नवलाख उंबरे येथील श्रीराम विद्यालयातील विद्यार्थी,शिक्षक युवराज सोनकांबळे,महिला सुरक्षा समितीचे पदाधिकारी आणि सदस्य, अनेक गावचे पोलिस पाटील उपस्थित होते.यावेळी विनयकुमार चौबे यांनी सांगितले की बालस्नेही संकल्पना व्यापक करण्यात येईल.मुलांवर लहानपणी त्यांचेवर चुकीचा ईफेक्ट झाला तर त्यांच्या भावी आयुष्यावर वाईट परीणाम होतो.यामुळे लहान मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे.यासाठी बालस्नेही कक्ष उघडण्यात आलेला आहे आणि ठिकठिकाणी असे कक्ष उघडण्यात येतील.यावेळी अजय चौधरी,शकील शेख,कॕरलींग,विद्यार्थिनी शिवाणी माडगी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विशाल हिरे यांनी केले.सुत्रसंचालन ऋषीकेश डिंबळे यांनी केले.आभार रणजित जाधव यांनी मानले.