इंद्रायणी मित्र परिवाराचा स्नेह मेळावा उत्साहात साजरा
मावळ दि.१९ :
इंद्रायणी महाविद्यालयातील इंद्रायणी मित्र परिवाराच्या वतीने वडगाव मावळ येथील हाॅटेल स्वागत या ठिकाणी शैक्षणिक वर्ष २००७-०८ मधील वरिष्ठ महाविद्यालयातील आर्यन्स ग्रुपचा दुसरा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रुप मधील सर्व मुला-मुलींनी स्व:परिचय देत आपल्या भावनांना मनोगतातून व्यक्त केले. यामध्ये प्रामुख्याने बॅक खात्यात असलेले अधिकारी भारतीय रेल्वे मधील अधिकारी खाजगी कंपनीत झालेले अधिकारी,व्यावसायिक तसेच शाळा कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरित असलेले व पोलिस निरीक्षक म्हणून काम करताना आलेले अनुभव तसेच आदींनी विविध क्षेत्रात काम करताना आलेले अनुभव व काही जुन्या नव्या आठवणींना मनोगतातून प्रत्येकाने विचार व्यक्त केले.
यामध्ये प्रामुख्याने पोलिस निरीक्षक संजय टेमगिरे बॅक अधिकारी तुकाराम अंत्रे,निरज पवार कंपनी अधिकारी शितल भोसले,तेजश्री बागले, विश्वेश लोंढे ,भारतीय रेल्वेतील सोमनाथ जाधव व्यावसायिक अमोल शिंदे, कविता मोरे, गिरीश गुजराणी, राजेश जाधव, प्रसाद लोणकर, अनंता आगळमे तसेच शिक्षक म्हणून कार्यरत असणारे प्रा.योगेश घोडके,निलम जाधव, अनुजा सोलंकी, महादेव खरटमल, मनिषा सोनवणे आदी जण उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी जानेवारी महिन्यात ज्यांचे वाढदिवस आहेत त्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व आलेल्या सर्व मुला-मुलींचे इंद्रायणी मित्र परिवाराच्या वतीने भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष लोंढे तर आभार अनुजा सोलंकी यांनी मानले.