नवीन समर्थ विद्यालयात स्वराज्य रक्षक श्री संभाजी महाराज स्मृतिदिन साजरा
तळेगाव दाभाडे :
दिनांक 11/3/2025 रोजी नवीन समर्थ विद्यालयामध्ये संभाजी महाराज स्मृतिदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या प्राचार्या सौ. वासंतीकाळोखे मॅडम, पर्यवेक्षक श्री शरदजांभळे सर, शिक्षक प्रतिनिधी योगेश पाटील सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख मिरा शेलार मॅडम, ज्येष्ठ अध्यापिका अरुणा बुळे मॅडम व दुर्गाभेगडे मॅडम कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे अध्यापक श्री. प्रशांत नरवटे सर यांनी केले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थी कु. अंकिता गिरी,कु.अणुष्का तांबे,कु.पुर्वी भालेकर,
आयुष खोपडे,अभय नेवसे, विनायक म्हाळसकर, विश्वजीत वाघमारे या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून संभाजी महाराजांविषयी माहिती सादर केली. त्यानंतर इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी संभाजी महाराजांच्या जीवनातील विविध शौर्यगाथा आपल्या गीतातून सादर केल्या . त्यानंतर शिक्षक मनोगतात
कु. मेधानेवाळे मॅडम व श्रीमती.दुर्गा भेगडे मॅडम यांनी संभाजी महाराजांचे जीवन चरित्र विविध प्रसंगातून सांगितले. शेवटी अध्यक्षीय भाषण शाळेच्या प्राचार्या सौ. वासंती काळोखे मॅडम यांनी केले ,तसेच आभार प्रदर्शन विद्यालयाच्या अध्यापिका सौ. अनिता आगळमे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सर्व नियोजन कु. ज्योती धनवट मॅडम, सौ.अनिता आगळमे मॅडम यांनी केले होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणव वाघमोडे व अथर्व बोंबले या विद्यार्थ्यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
सर्व पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले तसेच सर्व
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही देखील मोलाचेसहकार्य केले.