भजन प्रार्थना जयघोषात आळंदीत राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि आळंदी नगरपरिषदे तर्फे आयोजन
आळंदी :
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी च्या वतीने ‘राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आळंदी येथे घाटावरील रक्षा विसर्जन स्तंभ येथे १२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता हा कार्यक्रम झाला. यावर्षी धनंजय पवार, मोहिनी पवार यांच्या भजनाचा कार्यक्रम झाला. अरुणा तिवारी यांनी किर्तन प्रस्तुत केले.परिसरातील ५०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन हे या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. विश्वस्त डॉ. मच्छिन्द्र गोर्डे, विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख, माजी नगरसेवक गांधी भवन आळंदी कार्याध्यक्ष देवराम घुंडरे-पाटील, गणपतराव कुऱ्हाडे-पाटील, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, सुनील पाटील, प्रा.संजीव कांबळे, अर्जुन मेदनकर, लक्षमन मेदनकर, नगरपरिषद कार्यालयीन अधीक्षक विष्णूकुमार शिवशरण,पांडुरंग तापकीर, प्रसाद बोराटे, नाना घुंडरे, विविध वारकरी संस्थांचे विद्यार्थी ,महिला, टाळकरी ,आळंदी नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी व युवक क्रांती दलाचे कार्यकर्ते, वारकरी बांधव, ग्रामस्थ, विद्यार्थी, युवक – युवती आणि राष्ट्रपित्याचा आदर करणारे नागरिक आवर्जून उपस्थित होते विश्वस्त सचिव अन्वर राजन यांनी अध्यक्षीय भाषण केले. आळंदी देवस्थानचे माजी विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख, प्रा संजीव कांबळे, माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील यांनी विचार व्यक्त केले. अभय देशपांडे यांनी आभार मानले. आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी विशेष सहकार्य केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि आळंदी नगरपरिषद यांनी संयोजन केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर महात्माजींच्या इच्छेनुसार त्यांच्या अस्थी रक्षेचे भारतातील प्रमुख नद्यांप्रमाणे इंद्रायणीमध्येही विसर्जन झाले. एका कलशातील अस्थी रक्षेचे विसर्जन आळंदी येथील इंद्रायणी नदीमधे दि. १२ फेब्रुवारी १९४८ रोजी करण्यात आले. त्यांची स्मृती म्हणून इंद्रायणी काठी रक्षा विसर्जन स्तंभ उभारण्यात आला. दरवर्षी १२ फेब्रुवारी रोजी आळंदी येथे गांधीजींना अभिवादन करण्यात येते. ७७ वर्ष ही परंपरा सुरु आहे.