तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांचे नागरिकांना आवाहन जलप्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेच्या मार्फत उभारण्यात आलेल्या केंद्रावरच गणेश मूर्तीचे विसर्जन करावे.

SHARE NOW

तळेगाव दाभाडे: सार्वजनिक गणेशोत्सव २०२५ नगरपरिषदेमार्फत तळेगाव दाभाडे शहरामध्ये गणेशोत्सव पर्यावरणपुरक पध्दतीने साजरा करणेसाठी व जलप्रदूषण रोखण्याच्या अनुषंगाने नागरिकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन तलाव, विहीर, नदी व इतर नैसर्गिक जलस्रोतांमध्ये न करता नगरपरिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या केंद्रावर मूर्ती विसर्जन किंवा मूर्तीदान करावे, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत शहरातील नागरिकांच्या सोयीकरिता शहरामध्ये विविध ठिकाणी मूर्ती विसर्जन आणि मूर्तीदान केंद्र उभारण्यात आली आहेत. तसेच ज्या नागरिकांना घरी मूर्तीचे विसर्जन करावयाचे आहे अशा नागरिकांना नगरपरिषदेमार्फत नगरपरिषद कार्यालय व संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्र.६ या दोन ठिकाणी अमोनियम बायकार्बोनेट पावडरचे मोफत वाटप करण्यात येत आहे. गणेशोत्सव काळात निर्माण होणारे निर्माल्य संकलन करणेसाठी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत दररोज ट्रॅक्टरद्वारे निर्माल्य कलश फिरविण्यात येणार आहे. तसेच मूर्तीदान केंद्राच्या ठिकाणीही निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. शहरातील नागरिकांनी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी निर्माल्य इतरत्र न टाकता निर्माल्य कलशात टाकावे, असे आवाहन नगरपरिषदेमार्फत करण्यात येत आहे.

Advertisement

अ) खालील प्रमाणे मूर्तीदान व विसर्जन केंद्र स्थापन करण्यात आली आहे.

१) नगरपरिषद कार्यालय मागील नथूभाऊ भेगडे पाटील शाळेचे मैदान

२) गाव तळे – अमर खडकेश्वर मंदिर जवळ

3) जुनी नगरपरिषद समोर –शिव शंभू स्मारक

4) यशवंतनगर (गोल ग्राउंड)

5) संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्र.६ (गुलाबी शाळा)

6) D-Mart शेजारी ईगल तळे

७) डाळ आळी – गोपाळे गुरुजी घर समोर

ब) खालील ठिकाणी मूर्तीदान केंद्र स्थापन करण्यात आली आहे

१) नगरपरिषद सध्याचे कार्यालय

 

तसेच गणेशोस्तवाच्याबद्दल काही समस्या असल्यास खालील टोल फ्री क्रमांक १८००-२३३-२७३४ किंवा Whatsaap No. 9890616089 या क्रमांकावर संपर्क करावा.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page