गणेश कुल यांची तळेगाव स्टेशन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदी निवड

SHARE NOW

तळेगाव दाभाडे: अमर हिंद मित्रमंडळाचे सक्रिय युवा कार्यकर्ते. गणेश चंद्रकांत कुल यांची तळेगाव स्टेशन राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या कार्याध्यक्षपदी निवड झाली. आमदार सुनील शेळके. राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या हस्ते गणेश कुल यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर सातकर यांनी कुल यांची निवड केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे. तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश धोत्रे.माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके.माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी. दिलीप खळदे. केशव कुल आदी नेते व पदाधिकारी उपस्थित होते. गणेश कुल यांच्या निवडीनंतर त्यांच्या मित्रपरिवाराने तसेच स्टेशन भागातील सर्व गणेश मंडळांनी. सामाजिक संस्थांनी कुल यांचे अभिनंदन केले. या नियुक्तीनंतर बोलताना गणेश कुल म्हणाले की युवकांना संघटित करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांना बळकट करण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीत राहील. तळेगाव शहराच्या विकासात युवकांचा सक्रिय सहभाग राहावा यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page