*राज्यस्तरीय फलक लेखन स्पर्धेत अतुल गायकवाड प्रथम*
तळेगाव दाभाडे :
जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून महिला दिन या विषयावर राज्यस्तरीय फलक लेखन स्पर्धा रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती यामध्ये ११५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. महिला सक्षमीकरण आणि सामाजिक जनजागृती या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे येथील मामासाहेब खांडगे सभागृहामध्ये या स्पर्धेचा बक्षीस वितरण संपन्न झाले. यावेळी प्रास्ताविकात बोलताना रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी चे अध्यक्ष मिलिंद शेलार म्हणाले, फलक लेखनातून कला शिक्षकांच्या सामाजिक जाणीवेला चालना देणे आणि त्यांच्या कलेला एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे. ही काळाची गरज आहे. कलाशिक्षकांनी समाज प्रबोधनाचा व स्त्री – सन्मानाचा सशक्त संदेश दिला आहे.
यावेळी नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे, महाराष्ट्र राज्य कला क्रीडा संघाचे उपाध्यक्ष किरण सरोदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कलाशिक्षक अतुल गायकवाड, योगेश गावित, संदेश पवार यांनी आलेल्या सर्व शिक्षकांसमोर फलक लेखन कसे करावे त्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली. याप्रसंगी प्रकल्प प्रमुख नितीन नागरे, संदीप मगर, विलास टकले, लक्ष्मण मखर आदी उपस्थित होते.
फलक लेखन स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे
प्रथम क्रमांक:- अतुल गायकवाड, बारामती
द्वितीय क्रमांक:- योगेश गावित, (सावंतवाडी) सिंधुदुर्ग
तृतीय क्रमांक:-परशुराम घाडगे, इंदापूर
उत्तेजनार्थ :-
संदेश पवार, भोर,
राहुल बच्छाव, नाशिक,
अमित भोरकडे, सोलापूर