*आढले खुर्द गावच्या उपसरपंचपदी श्री.महेंद्र भोईर यांची बिनविरोध निवड*

SHARE NOW

मावळ :

ग्रामपंचायत आढले खुर्द च्या उपसरपंचपदी महेंद्र भोईर यांची बिनविरोध निवड झाली आहे.ठरविलेला कालावधी पूर्ण झाल्याने मावळत्या उपसरपंच सोनल जगदाळे यांनी आपल्या राजीनामा दिला होता.त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच नंदा भालेसेन यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली.यावेळी विहित मुदतेत महेंद्र भोईर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची अविरोध निवड सरपंच नंदा भालेसेन यांनी जाहीर केली.

Advertisement

ग्रामविकास अधिकारी पूनम जमदाडे सभेचे सचिव म्हणून प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली.यावेळी माजी उपसरपंच योगेश भोईर ,ग्रामपंचायत सदस्य पप्पू चांदेकर ,मंगेश येवले सदस्या मंदा घोटकुले ,चैत्राली पशाले ,शैला भोईर यांच्या सह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page