तळेगाव येथे रजत जयंती ध्यान महोत्सव संपन्न
तळेगाव दाभाडे येथील लायन डॉ. दीपक शहा सभागृहात तेजज्ञान फाउंडेशन आणि लायन्स क्लब तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रजत जयंती ध्यान महोत्सव नुकताच संपन्न झाला. तेज ज्ञान फाउंडेशनच्या वतीने प्रवर्तक महेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष प्रा. अनिल तानकर यांनी लायन्स क्लब मान्यवरांचं स्वागत करून ध्यान महोत्सवास शुभेच्छा दिल्या!यावेळी ज्येष्ठ लेखक वक्ते डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांनी मनोगत व्यक्त केले.तेजज्ञान फाउंडेशनच्या ज्ञान आणि अनुभव संपन्न मार्गदर्शक रूपाली दिघे यांनी ध्याना विषयीचे- तंत्र आणि मंत्र याबाबत उपस्थितांकडून प्रात्यक्षिक करवून माहिती दिली.तसेच उपस्थिताच्या शंकाचे निरसन केले! फाउंडेशनचे सदस्य सुनील वाळुंज आणि त्यांच्या पत्नी प्रमिला वाळुंज यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. अनंत जोशी, दिप्ती भोसले तृप्ति पळसे सचिन राठोड, श्रीमान रमेश देवमाने, श्रीमान मंगेश मराठे, यांनी सहकार्य केले.