एक दिवस शाळा – काॅलेजसाठी – तळेगाव वाहतूक विभागाच्या वतीने इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

SHARE NOW

दि.१८.तळेगाव दाभाडे प्रतिनिधी :

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे वाहतुक विभागाच्या वतीने एक दिवस शाळा काॅलेज मध्ये या उपक्रमाअंतर्गत दर गुरुवारी हद्दीतील शाळा-कॉलेज मध्ये भेट देवून मुलांनी माहिती देऊन जनजागृती करणे.या उपक्रमाअंतर्गत इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयात वाहतूक शाखेच्या उपक्रमाची माहिती देण्यात आली.

Advertisement

याप्रसंगी सहायक पोलिस निरीक्षक तळेगाव वाहतूक विभागाचे गणेश लोंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाहतूकीचे नियम व वाहन चालवताना लायसन्स किती महत्वाचे आहे. तसेच महिला सुरक्षा मुलींचा सन्मान करणे वाढती सायबर क्राईम अपघात,बॅंकेचे ऑनलाइन व्यवहार करताना कोणती काळजी घेतली पाहिजे.आदी विषयांच्या संदर्भात मार्गदर्शन केले.सदर उपक्रमासाठी पोलिस हवालदार दिपक काठे यांनी समन्वय साधला.

यावेळी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे उपप्राचार्य संदिप भोसले समन्वय गोरख काकडे सर्व विभागांचे विभागप्रमुख शिक्षकवृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश घोडके यांनी केले तर आभार आर.आर.डोके यांनी मानले.या उपक्रमासाठी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या अध्यक्ष रामदास काकडे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page