*तळेगाव स्टेशन भागात दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार*
तळेगाव दाभाडे :
इंद्रायणी पाणीपुरवठा केंद्राशी जोडलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून गुरुवारी(दि.१२) आणि शुक्रवारी (दि.१३) केली जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही दिवशी स्टेशन भागातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी कळविले आहे.
तळेगाव स्टेशन विभागातील सुमारे ४० हजारांवर नागरिकांना येत्या दोन दिवस पाणी जपून वापरावे लागणार आहे. यशवंतनगर, भालेराव कॉलनी, वतननगर, भाटिया कॉलनी, मनोहरनगरी, स्वराजनगरी, फलकेवाडी, सिद्धिविनायक सोसायटी तसेच आनंदनगर आणि इंद्रायणी कॉलनी या घनदाट लोकवस्तीच्या परिसरात पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. नोकरदारवर्ग आणि सोसायट्यातील रहिवाशांची यामुळे गैरसोय होणार आहे.
शनिवारी (दि.१४) शनिवारपासून पाणी पुरवठा पूर्ववत सुरू होण्याची शक्यता आहे.