कलापिनी संचलित- स्वास्थ्य योग वर्धापन दिनाचा दिमाखदार सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न
तळेगाव दाभाडे :
कलापिनी संचलित- स्वास्थ्य योग वर्धापन दिनाचा दिमाखदार सोहळा दिनांक सात मे रोजी संपन्न झाला या समारंभाचे प्रमुख पाहुणे काळोखे गुरुजी आणि श्रीकृष्ण मुळेसर या उभयतांनी कलापिनी संस्थेने त्यांचा यथोचित गौरव केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून वर्धापन दिनानिमित्त कलापिनीला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ लेखक- वक्ते डॉक्टर शालिग्राम भंडारींनी मराठी लोकधारा अपार कष्ट घेऊन अप्रतिम प्रकारे सादर करणाऱ्या वयाची साठी सत्तरी ओलांडलेल्या सर्व कलाकारांचे उपस्थितांतर्फे विशेष कौतुक आणि अभिनंदन केले! या आनंददायी लोकधारा सादर करणाऱ्यात यशवंतनगर,वतननगर,नाना- नांनी पार्क आणि सासर माहेर या हास्य संघाचा विशेष सहभाग होता! मीरा कोन्नूर आणि दीप्ती आठवले यांच्या उत्कृष्ट सूत्रसंचलाने समारंभाची उंची वाढतच गेली कलापिनीचा अनुभवसंपन्न सक्षम हात ज्यावेळी कलाकारांच्या खांद्याला परीस स्पर्श करतो- त्यावेळी त्या कलाकाराच्या कलेच अक्षरशः सोनं होतं- याची अनुभूती सर्व उपस्थित रसिकश्रोते अनुभवत होते. अशाभावना डॉक्टर भंडारींनी काव्यपंक्तीतून,शेरोशायरीतून व्यक्त केल्या! वाढदिवसा निमित्त गुरुवर्य योगाचार्य श्री व सौ अशोक बकरे सरांना पुणेरी पगडी शाल श्रीफळ प्रदान करून- मान्यवरांच्या शुभहस्ते सरांचा यथोचित सत्कार करण्यात आला! रसिक प्रेक्षकांना जवळजवळ दोन तास जागेवर खीळवून ठेवणाऱ्या या आनंददायी समारंभाच- उत्कृष्ट मार्गदर्शन होते ते- कलापिनीचे सर्वेसर्वा -अनुभव संपन्न डॉक्टर आनंत परांजपे सरांच! या अविस्मरणीय समारंभाची सांगता स्वादिष्ट अल्पोपहाराने झाली!