तळेगावात चोरट्यांकडून हवेत गोळीबार, फौजदाराने दाखवलेल्या प्रसंगावधावणामुळे चोरी करण्याचा फसला डाव.
तळेगाव दाभाडे:
गुरुवारी दिनांक 9 मे ला दुपारी तळेगाव दाभाडे या ठिकाणी चोरी करण्यासाठी घरात घुसलेल्या चोरट्यांना शेजारी राहणाऱ्या फौजदाराने हटकले. त्यामुळे चोरट्याने हवेत गोळीबार करा दुचाकीवरून पळ काढला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथील लिंबा फाट्या जवळील कॉलनीत पोलीस उपनिरीक्षक शाम शिंदे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. श्याम शिंदे हे तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत दुपारच्या सुमारास घराच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे कॉलनीत आले होते. त्यावेळी कॉलनीतील एका बंद बंगल्याच्या बाहेर एक संशयित आढळून आला. संशयिताने चेहऱ्याला मास्क लावला होता. त्यामुळे उपनिरीक्षक शिंदे यांनी त्याला हटकले तू कोण आहेस? येथे कशासाठी आलास?कोणाकडे आलास? कोणाला भेटायचे आहे? असे प्रश्न शिंदे यांनी त्याला विचारले याचा राग आल्याने आरोपीने त्यांना उर्मट उत्तरे दिली.’ ये चल तू तेरा काम कर, मै अलग टाईप का इन्सान हू ‘असे म्हणत आरोपीने दमदाटी केली.
मात्र उपनिरीक्षक शिंदे यांनी पुन्हा विचारणा केली. त्यावेळी संशयिताने त्याच्या खिशातील पिस्तूल दाखवले. शिंदे यांनी आरडाओरडा केला चोर आले चोर आले असे म्हणून शिंदे यांनी कॉलनी तर इतर लोकांना बोलावले त्यांचा आवाज एकूण बंगल्याच्या आत असलेला एक चोरटा बाहेर आला, भिंतीवरून उडी मारून तो आणि बाहेर थांबलेला त्याचा एक साथीदार असे दोघेही त्यांच्या दुचाकीवरून पळून जात होते. त्याचवेळी कॉलनीतील काही जण तेथे आले त्यावेळी दुचाकी वरील संशयिताने त्याच्या पिस्तुलातून गोळी झाडली त्यानंतर दोघेही दुचाकी वरून भरधाव निघून गेले.
घटनेबाबत उपनिरीक्षक शिंदे यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांना माहिती दिली त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक किशोर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक आयुक्त देविदास घेवारे, यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकाने देखील भेट दिली.
चोरट्याने पाळत ठेवून घरात कोणीही नसल्याची खात्री करून चोरीचा प्रयत्न केला. घराच्या सेफ्टी डोअर चे कुलूप तोडून कटावणीने मुख्य दरवाजाचे लॅचलॉक उचकटले. त्यानंतर एका चोरट्याने बंगल्यात प्रवेश केला तर एक जण बाहेर पहारा देत होता मात्र फौजदाराने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्यांचा चोरीचा डाव फसला.
घडलेल्या घटनेनंतर चोरटे दुचाकीवरून जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून मुंबईच्या दिशेने पळून गेले. दरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून चोरट्यांचा माघ काढण्याचा प्रयत्न केला. फौजदार श्याम शिंदे यांनी केलेल्या वर्णनावरून चोरट्यांची ओळख पटवण्यात आली आहे. चोरटे एका विशिष्ट समाजातील असून ते अट्टल गुन्हेगार आहेत. त्यांच्या शोधासाठी स्थानिक पोलिसांची तसेच गुन्हे शाखेचे पथके रवाना करण्यात आली आहेत.