महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा यांचे कौतुकास्पद कार्य. मयत झालेल्या कामगाराच्या मुलींना कंपनी कडून आर्थिक मदत द्यायला लावली
लोणावळा:
लोणावळा शहरातील ऑटोमॅटिक एलटीडी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत काम करणारे कामगार दत्तात्रेय बापु कोळसकर(वय ३९.रा.क्रांती नगर. लोणावळा) यांचा कंपनीत कामावर असताना मृत्यू झाला होता. कोळसकर हे गेल्या सहा महिन्यापासून सदरील कंपनीत कामाला होते. काम करत असताना अचानक त्यांना चक्कर आली व त्यांच्या डोक्याला मार लागून कंपनीतच त्यांचा मृत्यू झाला. कंपनीमध्ये काम करत असताना कंपनीने त्यांना एस आय .पीएफ .व इतर सुविधा देखील दिल्या नव्हत्या. घरातील एकमेव कमवता व्यक्ती अचानक मृत्यू पावल्याने या कामगाराचे कुटुंब आर्थिक विवंचनेत होते. अशातच सदरील कंपनी मयत कामगारांची कोणत्याही प्रकारची जबाबदारी घ्यायला तयार नव्हती. तसेच कंपनीने कामगारांचा कोणत्याही प्रकारचा इन्शुरन्स काढला नव्हता. मयत कामगाराच्या कुटुंबाला भरपाई देखील द्यायला कंपनी तयार नव्हती. या संपूर्ण घटनेची माहिती मनसे लोणावळा शहराचे अध्यक्ष निखिल भोसले. मनसे प्रवक्ते अमित भोसले. उपाध्यक्ष दिनेश कालेकर.आदी पदाधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी याबाबत कंपनीला विचारणा केली असता. कंपनी त्यांना उडवा उडवी चे उत्तरे देत होती. आर्थिक मदत करणार नाही अशी भूमिका कंपनीची होती. यावेळी मनसेच्या या पदाधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेतली. त्यामुळे कंपनीने मयत कामगाराच्या तीन मुलींच्या नावे प्रत्येकी एक लाख रुपये असे तीन लाख रुपये तत्काळ मयत कामगाराच्या मुलींच्या नावे दिली. मनसेच्या कठोर भूमिकेमुळे कंपनीने तीन लाख रुपये मयत कामगाराच्या मुलींना मिळवून दिले. मनसेच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदरील मयत कामगाराच्या कुटुंबाने मनसे लोणावळा शहराच्या पदाधिकाऱ्यांमुळे आम्हाला कंपनीने आर्थिक मदत केली. असे सांगितले व सर्व मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.