# हॉस्पिटलमध्ये गेलेल्या आजीची नातवंडे बेपत्ता झाली होती. पोलिसांच्या तत्परतेमुळे दोन्ही मुलांचा लागला शोध
इंदोरी :
मावळ तालुक्यातील इंदोरी गावातील एक वृद्ध महिला तिच्या दोन नातवंडांना घरी ठेवून हॉस्पिटलमध्ये गेली होती. वृद्ध महिला हॉस्पिटल मधून घरी आल्यानंतर दोन्ही नातवंडे घरी नसल्याचे लक्षात येताच या वृद्ध महिलेने तत्काळ तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडे धाव घेतली. व या घटनेची सविस्तर माहिती त्यांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी परिसरात शोध मोहीम राबवली. या शोध मोहिम मध्ये दोन्ही मुले घरापासून एक किलोमीटर अंतरावर इंदोरी येथील बैलगाडा शर्यतीच्या घाटात एका पाण्याच्या खड्ड्यात खेळताना आढळून आली. त्यानंतर या दोन्ही मुलांना त्यांच्या आजीकडे सुखरूप पणे सुपूर्त करण्यात आले. सोमवार दिनांक ९जुन २०२५ रोजी सकाळी दोन्ही मुलांची आजी कल्पना विश्वनाथ वेताळ या पिंपरी येथील वाय सी एम हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी या दोन्ही मुलांना त्यांनी आपला दुसरा मुलगा गणेश याच्या घरी ठेवले. या दोन्ही लहान मुलांचे आई-वडील यांचे निधन झाले असल्याने या दोन्ही मुलांचा सांभाळ त्यांची आजी कल्पना वेताळ या करत आहे. चुलते गणेश याला दारूचे व्यसन असल्याने आई हॉस्पिटलला जातात तो देखील घरातून निघून गेला. दोन्ही मुले चुलता गणेश च्या मागे जाऊ लागली. गणेश यांने दोन्ही लहान मुलांना दहा रुपये दिले आणि घरी जाण्यास सांगितले. दोन्ही मुलांच्या लक्षात आले नाही की घरी कसे जायचे त्यामुळे ती मुले भरकटली. काही वेळाने गणेश घरी आला असता दोन्ही मुले दिसले नाहीत. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आजी कल्पना वेताळ हॉस्पिटल मधून घरी आल्या. त्यांना हा प्रकार समजला त्यांनी थेट तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने शोध मोहीम राबवली व या दोन्ही मुलांचा शोध घेतला. त्यावेळी दोन्ही मुले घरापासून एक किलोमीटर अंतरावर सापडली. उप पोलीस निरीक्षक प्रशांत रेळेकर. पोलीस हवालदार वसीम शेख. यांच्यासह तळेगाव एमआयडीसी पोलिसांच्या तत्परतेमुळे दोन्ही मुलांचा शोध लागला. दोन्ही मुलांना सुखरूप पणे त्यांच्या आजीच्या कडे सुपूर्त करण्यात आले. श्रेयश वेताळ(वय ७ वर्ष) स्वराज वेताळ(वय ५ वर्ष) अशी या मुलांची नावे आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.