तळेगावसह मावळ परिसरात वटपौर्णिमेच्या उत्साह

SHARE NOW

तळेगाव दाभाडे:

Advertisement

शहरांमधील व मावळ परिसरातील अनेक भागात वडाच्या झाडाची मनोभावे पूजा वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिला भगिनी करत आहे. वडाच्या झाडाला सूत गुंडी बांधून वडाला प्रदक्षिणा घालत आहे. पती-पत्नीचे नाते सात जन्म टिकावे यासाठी ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमेला सर्वच सुवासिनी वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घालतात. तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी महिला आपल्या पतीसाठी उपवास देखील धरतात. वटपौर्णिमा सणाचे पती-पत्नीच्या नात्यासंबंधी अनेक महत्त्व आहे. पती-पत्नीचे नाते दृढ व्हावे ही या सणाची मूळ संकल्पना आहे. वडाचे झाड हे दीर्घायुर्षी असल्याने व ते भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देणारे असते म्हणून त्याची पूजा करण्याची प्रथा हजारो वर्षापासून भारतीय संस्कृतीच्या भाग राहिली आहे. तळेगाव व परिसरात अनेक ठिकाणी महिला भगिनी पारंपारिक वेशभूषेत तयार होऊन सामूहिक पणे वडाची पूजा करताना दिसत आहे. तसेच अनेक महिलांनी उपवास धरून घरीच वडाच्या झाडाची फांदी आणून पूजन केले. तर अनेक महिलांनी घरीच वडाचे झाड लावून पतीच्या दीर्घा आयुष्यासाठी प्रार्थना केली. हिंदू पंचांगातील वैधी पोर्णिमा म्हणजे वटपोर्णिमा या दिवशी वडाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वड हा वृक्ष अनेक वर्ष सर्व ऋतूमध्ये भक्कम पणे उभा राहणारा वृक्ष आहे. या संदर्भात तळेगावातील एका ज्येष्ठ महिला भगिनेने सांगितले की पूर्वीच्या स्त्रिया तीन दिवस व्रत करायच्या. मात्र आता पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया व्रत व उपवास धरतात.शहर तसेच ग्रामीण भागात महिला भगिनी हा वटपौर्णिमेचा दिवस अत्यंत आनंदाने आणि भक्ती भावाने साजरा करतात. तर अनेक महिला वटपौर्णिमेच्या व्रताची कथा वाचल्याशिवाय हे व्रत पूर्ण झालेले मानले जात नाही असे समजतात.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page