नर्सिंग स्कूल मध्ये जागतिक परिचारिका सन्मान दिन साजरा.
तळेगाव दाभाडे :
तळेगाव जनरल हॉस्पिटल संचलित नर्सिंग स्कूलच्या परिचारिकांचा सन्मान समारंभ मंगळवार दिनांक 14 मे रोजी संपन्न झाला.
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गणेश खांडगे होते तर प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर दिपाली झंवर उपस्थित होत्या. संस्थेचे चेअरमन शैलेश शहा, रोटरीयन राकेशजी सिंघानिया, आणि स्कूलचे पालक डॉक्टर शालिग्राम भंडारी, प्राचार्या मोनालिसा पारगे, उपप्राचार्य क्रिस्टीना टी यावेळी उपस्थित होते.
सुरुवातीला प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन झाले. साहित्य, कला, क्रीडा आदी स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
अध्यक्ष गणेश खांडगे परिचारिकांना संबोधित करताना त्यांच्या कर्तव्याची जाणीव देत परिचारिका सन्मान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
चेअरमन शैलेश शहा यांनी मार्गदर्शनात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे किती आवश्यक आहे याची माहिती दिली. रोटरीयन राकेश सिंघानिया यांनी समारंभाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पाहुण्या डॉक्टर दिपाली यांनी वैद्यकीय व्यवसायातील निष्ठेच्या संदर्भात विद्यार्थ्यांशी अचूक संवाद साधला. डॉक्टर भंडारी यांनी आदर्श मानवी जीवनशैलीचा संकल्प, विविध दाखले, काव्यपंक्ती आणि दृष्टांताद्वारे मार्गदर्शन केले.
समारंभ यशस्वी ते करता नर्सिंग स्कूलचा सर्व शैक्षणिक स्टाफ आणि तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.