वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीची जपणूक; देणग्या व सेवाभावी उपक्रमांनी साजरा सोहळा

SHARE NOW

देहूगाव :

आजच्या धावपळीच्या व दिखाऊपणाच्या काळात वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतींमध्ये बदल होत असताना, देहूगाव येथील अनिरुद्ध काळोखे यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपला वाढदिवस साध्या आणि अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करून वेगळा आदर्श घालून दिला.

वाढदिवसानिमित्त कोणताही अनावश्यक खर्च टाळत त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले. संत तुकाराम महाराज पालखी रथाच्या कामासाठी त्यांनी ११ हजार रुपयांची देणगी दिली. तसेच वात्सल्य वसतीगृहातील मुलांना आणि माळवाडी येथील वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना भोजन देण्यात आले.

Advertisement

याशिवाय, रासे परिसरात जनावरांसाठी मोफत चाऱ्याचे वाटप करून त्यांनी पर्यावरण व प्राणीसंवर्धनाची जाणीवही जपली. या उपक्रमांमुळे त्यांच्या वाढदिवसाला सामाजिक सेवेची जोड मिळाली.

या वेळी प्रा. अमित घेनंद, संभाजी टिळेकर, नारायण पचपिंड, रवी काळोखे, अजय तेलगू, रवींद्र चव्हाण, किरण चव्हाण यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होता.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page