तळेगाव चा सुपुत्र दुबईमध्ये करणार शिवव्याख्यान
तळेगाव दाभाडे: येथील प्राध्यापक. इतिहास संशोधक. शिवव्याख्याते.डाॅ प्रमोद सोमनाथ बोराडे हे दुबईमध्ये CMS टीम आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यात करणार शिवव्याख्यान. दुबई येथे रविवार दिनांक १ जुन २०२५ रोजी सकाळी १०:३०ते दुपारी ३: वाजेपर्यंत स्विस इंटरनॅशनल स्कूल.अल जद्दाफ. दुबई येथे शिवराज्याभिषेक सोहळा २०२५ चे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात डॉ प्रमोद बोराडे हे छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित शिव व्याख्यान देणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री युवराज मालोजीराजे छत्रपती( छत्रपती करवीर गादी) सतीश ज्ञानदेव राऊत.( जिल्हाधिकारी. महसूल विभाग महाराष्ट्र शासन)डाॅ प्रमोद बोराडे हे मान्यवर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमात मोगल मर्दानी महाराणी ताराबाई साहेब यांचे ऐतिहासिक एक्झिबिशन. शिव शाहू पोवाडा मंच कोल्हापूर. शिवशाहीर दिलीप सावंत यांचे झेप शिव विचारांची गर्जना महाराष्ट्राची हा कार्यक्रम होणार आहे. तसेच स्वामिनी आणि श्रीमंत ढोल ताशा पथक यांचे ढोल ताशा सादरीकरण व इतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. डॉ प्रमोद बोराडे हे दुबईमध्ये शिव व्याख्यान देणार असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनेक मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या.डाॅ प्रमोद बोराडे यांनी आजवर देशभर अनेक ठिकाणी शिव विचारांचा जागर मांडलेला आहे.