भारताची पहिली राष्ट्रीय टोल फ्री नार्कोटिक्स हेल्पलाइन सुरू.१९३३ या हेल्पलाइन क्रमांकावर नागरिकांना संपर्क करण्याचे आवाहन.
मावळ :
भारत सरकारच्या नशा मुक्त उद्दिष्ट नुसार अंमली पदार्थाच्या विक्री. वितरण व गैरवापराच्या विरोधात MANAS हि हेल्पलाइन क्रमांक १९३३ सुरू करण्यात आली असून. केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी कार्यवाही अधिक प्रभावी करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर सदरील हेल्पलाइन ११ जानेवारी २०२५ पासून २४/७ कार्यरत आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात अंमली पदार्थाची बेकायदेशीर विक्री. तस्करी किंवा वापर होत असल्यास गुप्तता राखून १९३३ या टोल फ्री क्रमांक वर संपर्क साधावा असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखेचे संदीप डोईफोडे यांनी केले आहे. नशा मुक्त भारत २०४७ या दृष्टिकोनातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमासाठी MANAS हेल्पलाइनच्या प्रभावी वापर होणे गरजेचे असून नागरिकांनी सामाजिक जबाबदारी म्हणून या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अनेक ठिकाणी अंमली पदार्थाची विक्री. तस्करी व वितरणाची माहिती वेळोवेळी समोर येत असते. त्यामुळे नागरिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत असून नागरिकांचे सहकार्य मिळाल्यास अंमली पदार्थ विरोधातील लढा अधिक परिणाम कारक होऊ शकतो असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.