*महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी*
तळेगाव दाभाडे येथे राणा राजपूत समाज महाराणा प्रतिष्ठान तर्फे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची ४८५ वी जयंती गुरुवारी (दि.२९) उत्साहात साजरी करण्यात आली.
येथील डाळ आळी मधील श्री दत्त मंदिरामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रम अध्यक्षा बसंतीताई रजपूत,तसेच राष्टवादीकाँग्रेस दिव्यांग सेल मावळ तालुका अध्यक्षा ज्योती ताई राजीवडे, भरत राजीवडे,च्या हस्ते करण्यात आले. यावेळी मयुर डाळवाले,आकाश डाळवाले, स्वप्निल सानंदा, प्रशांत हिरवणे, केदार राणा(सितापुरे), अक्षय राणा, प्रसाद राणा, मंगेश डाळवाले,संभाजी परमार,मनीष डाळवाले, प्रमोद डाळवाले,योगेश सितापुरे हे उपस्तीत होते.
कार्यक्रमात महाराणा प्रतापसिंह यांच्या शौर्य गाथेवर डॉ. गौरव धंदुके यानी मनोगत व्यक्त केले, तसेच ज्योती ताई यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अक्षय डाळवाले यानी केले.