मावळ एकता कलामंच आयोजित खुल्या काव्य स्पर्धांचे आयोजन,बक्षीस वितरण आणि कलाकारांचा सन्मान
लोणावळा,:

मावळ एकता कलामंच आयोजित खुल्या काव्य स्पर्धांचे आयोजन,बक्षीस वितरण आणि कलाकारांचा सन्मान कार्यक्रम नुकताच लोणावळा नगरपरिषद शाळा क्रमांक एक येथे उत्साहात संपन्न झाला यावेळी मावळातील १९ कवींनी आपला सहभाग नोंदवला.यात तळेगाव येथील जयवंत पवार यांची माझी बहीण यांच्या हृदय स्पर्शी कवितेला प्रथम क्रमांक मिळाला तर विजय जोरी मृण्मयी काळे यांना द्वितीय तृतीय यांना बक्षीस सन्मान पत्र सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. आणि विशाल कांबळे यांना उत्तेजनानार्थ बक्षीस देण्यात आले. यानंतर सदर कार्यक्रमात मावळातील मातीचा इंदोरी येथील अभिनेता अविनाश शिंदे,लोणावळ्यातील गायक,वृत्त निवेदक प्रदीप वाडेकर,येथील जेष्ठ कवियत्री सिंधुताई जाधव आणि कुरवंडे येथील ताशा वादक,शिवतेज गर्जना पथक श्री कुमार अजय जांभुळकर यांना सन्मान चिन्ह सन्मान पत्र शाल देऊन गौरविण्यात आले.तसेच डॉ शुभांगी सरोटे यांच्या भारतीय जवानांसाठी करत असलेल्या कार्याबद्दल आणि सचिन आखाडे यांना शेतकी क्षेत्रातील योगदानबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोणावळा महाविद्यालयाचे प्राचार्य श्री नरेंद्र देशमुख,सामाजिक कार्यकार्ते नंदकुमार वाळुंज आणि जेष्ठ पत्रकार श्री चंद्रकांत बाळकृष्ण जोशी मावळ एकता कला मंच चे अध्यक्ष साप्ताहिक मावळ नागरिक चे मुख्य संपादक ऍड संजय पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.मावळ एकता मंच च्या दुसरा वर्धापन दिन निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यासाठी मावळ एकता कला मंच चे उपाध्यक्ष ऍड ईश अग्रवाल,सचिव ज्योति टोपे,शिल्पा येवले,रितेश भोमे,वर्षा येवले,शुभांगी टाव्हरे यांचे सहकार्य लाभले.
सदर कार्यक्रमासाठी ऍड.प्रथमेश रजपूत आणि सुरेश गायकवाड यांनी सहकार्य केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी शिरस्कर यांनी केले.सन्मानित कलाकारांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच प्रसिद्ध नृत्य विशारद सुरज सरावते यांनी मावळ एकता कला मंच नवोदित कलाकारांनांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत असल्याचे मत व्यक्त केले. आहे.यात लोणावळ्यातील माजी उपनगराध्यक्ष भरत हरपुडे,मनसेचे भारत चिकणे,जेष्ठ नागरिक संघांचे पांडुरंग तिखे,संगीत प्रेमी राजेशजी मेहता,जेष्ठ समाज सेवक धीरूभाई कल्याणजी उपस्थित होते. तर राजेंद्र दिवेकर,बापूलाल तारे यांनी कविता सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत भरली.यावेळी बहुजन वंचित आघाडी लोणावळा यांच्या वतीने संविदान पत्र फ्रेम देऊन मावळ एकता कला मंच चे अध्यक्ष ऍड संजय पाटील यांच्या सन्मान करण्यात आला.






