इंद्रायणी महाविद्यालयाचा “लाइटहाऊस” सोबत सामंजस्य करार – विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा!
तळेगाव दाभाडे –

इंद्रायणी महाविद्यालय आणि लाइटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला असून, या करारामुळे विद्यार्थ्यांसाठी कौशल्यविकास, प्रात्यक्षिक ज्ञान व करिअरकेंद्रित प्रशिक्षणाच्या माध्यमातून नवे दालन खुले झाले आहे.
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये उद्योगसिद्ध कौशल्यांचा विकास करून त्यांना रोजगारक्षम बनविणे हे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या वेळी लाइटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन चे अभिषेक धर्माधिकारी, इंद्रायणी महाविद्यालयाचे कार्यकारी सदस्य युवराज काकडे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील व उपप्राचार्या डॉ. अमृता सुराणा उपस्थित होते.
या प्रसंगी युवराज काकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “या MoU मुळे विद्यार्थ्यांना विविध उद्योगांशी जोडले जाण्याची, रोजगारक्षम कौशल्ये आत्मसात करण्याची आणि व्यक्तिमत्त्व विकासाची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा अधिकाधिक लाभ घ्यावा.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. महेश पवार यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. अमृता सुराणा यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष रामदास आप्पा काकडे, सचिव चंद्रकांत शेटे, खजिनदार निरुपा कानिटकर तसेच सर्व संचालक मंडळ नेहमीच विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रेरक ठरले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच संस्थेची वाटचाल यशस्वी होत आहे.
इंद्रायणी महाविद्यालयाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरला आहे.






