स्मशानभूमी साठी कोणी जागा देईना,चार किलोमीटरचा वळसा घालून करावे लागते अंत्यसंस्कार येवलेवाडी गाव स्मशानभूमी नसल्याने नागरिकांचे हाल
कान्हे: ग्रुप ग्रामपंचायत कान्हे मधील येवलेवाडी गाव हे स्मशानभूमीविना आहे. येवलेवाडी गावाला स्मशानभूमी नसल्याने गावातील मृत नागरीकाचे अंत्यसंस्कार चार किमी अंतर वळसा घालून करावे लागत आहे . . अशावेळी अंत्यविधीस आलेल्या पाहुणे मंडळी, नातेवाईक यांनाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे मरणानंतरही मृतदेहाला मरणयातना सहन कराव्या लागत असून ग्रामपंचायत स्वयंघोषित पुढाऱ्याने प्रशासकीय विभागाने याकडे लक्ष द्यावे आणि गावाला स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
गावाला स्मशानभूमी नाही. मात्र स्वतः ग्रामस्थही याबाबत पुढाकार घेताना दिसत नाही. सध्या जिथे मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात आहेत, ती जागा वन विभागाच्या क्षेत्रात असल्याने तिथे जाण्याचा मार्ग हा खाजगी मालकाने बंद केल्यामुळे येवलेवाडी येथील नागरिकांना चार किलोमीटरचा आवळसा घालून अंत्यविधी करावा लागत आहे
” स्मशानभूमी असावी पण दुसऱ्याच्या जागी त्या वृत्ती प्रमाणे गावात कोणीही आपली जागा स्मशान भूमीला देत नसल्याने अनेक आडचणी निर्माण झाल्या असल्याचे
ग्रामस्थांनी सांगितले. तर आपल्या जागेशेजारी स्मशानभूमी झाल्यास आपल्या जागेची किंमत कमी होईल, यामुळे कुणी स्मशानभूमीला जागा देऊ करीत असेल तर विरोध होत असल्याचे सत्यही ग्रामस्थांनी बोलून दाखविले. एकंदरीत जागा आणि पैशाच्या विचारात स्मशानभूमी अडकल्याचे दिसते.
“पादंन रस्त्यावर धनधाडगाचे अतिक्रमण”
पूर्वी येवलेवाडी नायगावला जोडला जाणारा पादंन वहिवाटी रस्ता होता असे तेथील जेष्ठ नागरिकांकडून सांगण्यात येत आहे हा रस्ता बंद झाल्याने चार किलोमीटरचा वळसा घालून नायगाव जावे लागत आहे
“दशक्रिया विधी” अंत्यसंस्काराच्या वेळी पुढार्यांची भाषणे स्मशान भूमीकडे मात्र दुर्लक्ष
येवलेवाडी गावाला स्मशानभूमी नसल्याने तेथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे मात्र गावातील स्थानिक पुढारी केवळ भाषण करत मात्र काही नाही असा प्रश्न तेथील नागरिक उपस्थित करत आहे
“येवलेवाडी गावला स्मशान भुमी नसल्याने अंत्यविधी करताना गैरसोय होत आहे येवलेवाडी ला स्मशानभूमी नसल्याने चार किलोमीटरचा वळसा घालून अंत्यसंस्कार करावे लागत आहे। तर काही वेळेस मिळेल त्या ठिकाणी उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहे गावातील नेतेमंडळी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावा। सोमनाथ येवले नागरिक येवलेवाडी






