एकेरी वाहतुकीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 160 वाहन चालकांवर लोणावळा शहर पोलीस स्टेशन कडून कारवाई.
लोणावळा :
लोणावळा शहरात वाहतूक सुरळीत चालण्यासाठी लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते इंद्रायणी पूल ते रानडे हॉस्पिटल अशी एकेरी वाहतुकीचे नियमन करून त्याबाबत ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आलेले असतानाही वाहन चालक हे वारंवार सदरहू आदेशाचा भंग करून एकेरी मार्गाचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास येत असल्याने आज सोमवार दिनांक 29 जुलै रोजी विशेष मोहीम राबवून एकेरी मार्गाचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 160 मोटार वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.
लोणावळा शहर पोलीस ठाण्यातर्फे वाहन चालकांना सदर एकेरी मार्गाच्या आदेशाचे पालन करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. तरी सर्व वाहन चालकांनी आदेशाचे पालन करावे.