बोपदेव घाटात पोलीस चौकी कार्यान्वित करा.. महेश भोईबार यांची मागणी..
कोंढवा पुणे :
बोपदेव घाटात असणारी धूळखात पडलेली पोलीस चौकी कार्यान्वित करा.
पोलीस चौकी सुरू करा अशी मागणी महेश भोईबार यांनी केली आहे.
बोपदेव घाट येथील बंद पडलेली पोलीस चौकी लवकरात लवकर सुरू करून येथील गुन्हेगारी लूटमार थांबवायला हवी अशी मागणी महेश भोई बार यांनी केली आहे.
रात्री, अपरात्री या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता लुटीचे, छेडछाडीचे, प्रकार घडल्याचे पहावयास मिळते. सदर घाट परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे घाटात बंद अवस्थेत असलेली पोलीस चौकी तातडीने सुरू करण्याची मागणी महेश भोईबार यांनी केली आहे. रात्री उशिरापर्यंत घाट परिसरात थांबणाऱ्या तरुण-तरुणींना देखील पोलिसांनी आवर घालण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
रात्री उशिरा प्रवास करणार्या प्रवाशांना रस्त्यात अडवून लुटमार केल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने तात्काळ येथील चौकी सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
*प्रतिक्रिया*
सदर घाट परिसरातील ठिकाणी पोलिसांची दिवसा व रात्री अशा दोन्ही वेळेत पोलिसांचा राऊंड होत असतो परंतु वर घाटावर असणारी पोलीस चौकीची पूर्ण माहिती घेऊन तात्काळ कारवाई करण्यात येईल.
संतोष सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन